नांदेड: ५ एप्रिल प्रतिनिधी
आपल्या आक्रमक कार्यशैलीने आणि गुन्हेगारांवर वचक बसवून सर्वसामान्यांना सुरक्षिततेची भावना निर्माण करून देणारे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलकर यांचा आज वाढदिवस. या निमित्ताने संपूर्ण पोलीस दलासह राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
जनतेचे रक्षण आणि गुन्हेगारांना जरब
ओमकार चिंचोलकर यांनी पदभार स्वीकारल्यापासून नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्यासोबतच, सामान्यांच्या तक्रारींना त्वरित न्याय देण्याला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. एक कडक शिस्तीचे आणि तितकेच संवेदनशील अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
शुभेच्छांचा वर्षाव
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. ‘लोकाभिमुख पोलीस प्रशासन’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी चिंचोलकर नेहमीच तत्पर असतात, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
“पोलीस दलातील एक अभ्यासू आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून पी.आय. ओमकांत चिंचोलकर यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना
नांदेड जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी आणि पोलीस दलाच्या सन्मानासाठी त्यांचे योगदान येणाऱ्या काळातही असेच महत्त्वपूर्ण राहील, असा विश्वास सर्वस्तरांतून व्यक्त होत आहे.
शुभेच्छुक
प्रतिनिधी माधव वाघमारे
(पत्रकार) नांदेड.












