aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, June 20, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home राजकारण

नांदेड-वाघाळा महापालिकेकडून माध्यम प्रतिनिधींसाठी प्रवेशिका प्रक्रिया जाहीर

Aawaz Times by Aawaz Times
December 29, 2025
in राजकारण
0
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड २९ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने आगामी सार्वत्रिक निवडणूक–२०२५ च्या अनुषंगाने माध्यम प्रतिनिधींना मतदान व मतमोजणी केंद्रांवर प्रवेश देण्यासाठीची प्रवेशिका (पास) प्रक्रिया अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. ही प्रक्रिया राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या ०९ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार राबवली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाने दिली आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, निवडणूक काळात प्रसारमाध्यमांच्या समन्वयासाठी माहिती व जनसंपर्क कक्षामार्फत कामकाज करण्यात येणार आहे. तथापि, निवडणूक प्रक्रियेतील प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश–२०२५ लागू असल्याने, महानगरपालिका आयुक्त किंवा त्यांच्या अधिकृत अधिकाऱ्यांच्या मान्यतेनेच माध्यम प्रतिनिधींना मतदान व मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे.

प्रवेशिकेबाबतचे निकष स्पष्ट
राज्य शासनाच्या यादीतील ‘अ’ (मोठे), ‘ब’ (मध्यम) आणि ‘क’ (लघु) वर्गातील दैनिक वृत्तपत्रांच्या प्रत्येकी दोन प्रतिनिधींना प्रवेशिका दिली जाईल.
राज्य शासनाच्या यादीतील साप्ताहिक वृत्तपत्राचा एक प्रतिनिधी पात्र ठरेल.
उपग्रह वाहिन्यांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी व एक कॅमेरामन यांना प्रवेश दिला जाईल.
भारतीय टपाल खात्याचा परवाना असलेल्या केबल वाहिन्यांच्या एका प्रतिनिधीला व एका कॅमेरामनला प्रवेशिका दिली जाईल.
याउलट, युट्यूब चॅनल, ऑनलाइन वृत्तपत्रे, संकेतस्थळे, सोशल मीडिया हँडल्स आदींना कोणत्याही प्रकारची प्रवेशिका देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
प्रवेशिकेसाठी माध्यम प्रतिनिधींनी संबंधित वृत्तसंस्थेच्या लेटरहेडवरील अर्ज,
दैनिकाचे संपादक/आवृत्ती प्रमुख यांचे शिफारसपत्र,
उपग्रह वाहिन्यांच्या बाबतीत विभागीय प्रतिनिधीचे (ब्युरो चीफ) शिफारसपत्र,
आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र व वृत्तसंस्थेची ओळखपत्राची छायांकित प्रत,
तसेच दोन छायाचित्रे सादर करणे बंधनकारक आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता व कालावधी
अर्ज कक्ष क्रमांक ९११, माहिती व जनसंपर्क कक्ष, मुख्य प्रशासकीय इमारत, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड येथे सादर करावेत.
अर्ज स्वीकारण्याची मुदत दि. २९ डिसेंबर २०२५ ते ०८ जानेवारी २०२६ अशी असून, प्रवेशिका वितरण दि. १२ जानेवारी २०२६ ते १४ जानेवारी २०२६ दरम्यान केले जाणार आहे. ठरलेल्या मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.

महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला असून, सर्व पात्र माध्यम प्रतिनिधींनी दिलेल्या अटी व शर्तींचे काटेकोर पालन करूनच अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

राजकीय स्टेटस ठेवाल तर नोकरी धोक्यात

Next Post

पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना लोकसंवाद चा उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी पुरस्कार जाहीर

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

राजकारण

पत्नीच्या सहीवर सत्ता आता नाही नगरसेवक पतींची ‘लुडबुड’ महागात थेट कारवाईचे आदेश

January 31, 2026
राजकारण

अजित पवार यांच्या विमानप्रवासाबाबत गंभीर प्रश्न LEARJET 45XR विमानावर आधीही अपघाताचे डाग

January 28, 2026
राजकारण

महत्त्वाच्या नेत्याच्या निधनानंतर महाराष्ट्रात तीन दिवस कार्यालयीन कामकाज बंद

January 28, 2026
राजकारण

निर्भीड पत्रकार मुक्ता कदम यांनी उघड केली नांदेडच्या विकासकामांची पोलखोल शहरातील वास्तव मांडत प्रशासनाला आरसा

January 16, 2026
राजकारण

प्रभाग क्र. ८ शिवाजीनगरमध्ये भाजपाचा जोरदार प्रचार डॉ. आंबेडकर नगरात सभेला मतदारांची मोठी गर्दी

January 8, 2026
राजकारण

प्रभाग क्रमांक ५ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मैदानात

January 7, 2026
Next Post

पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना लोकसंवाद चा उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved